InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आम्हालाही भारतात सामावून घ्या; पाकव्याप्त काश्मिरी नागरिकांची मागणी

- Advertisement -

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 नुकतेच रद्द करण्यात आले. दरम्यान पाकव्याप्त काश्मीराला भारताने आपल्यात सामावून घ्यावे अशी मागणी केली जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान परिसरातील नागरिकांनी आम्हाला भारताच्या संविधानावर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे. आम्हालाही भारतात घ्या आणि भारतीय संविधानातील अधिकार द्या अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

- Advertisement -

सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते सेंग एच सेरिंग हे गिलगिट-बाल्टिस्तानमधील नागरिकांच्या हक्कांसाठी लढतात. येथील नागरिकांनाही भारतात येण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले आहेत. अमित शाह यांनी ज्याप्रकारे काश्मीरातील नागरिकांना भारतात सामावून घेतले.  तसेच पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग आहे. यासोबतच गिलगिट-बाल्टिस्तान सुद्धा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे आम्हाला वाटते असे ते म्हणाले. गिलगिट-बाल्टिस्तान लडाखचाच विस्तारीत भूप्रदेश आहे. आम्ही भारतीय संघराज्याचा भाग असलेल्या प्रदेशातील नागरिक म्हणून भारतीय संविधानानुसार देण्यात येणारे अधिकार आम्हालाही देण्यात यावेत असे ते म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.