पत्रकारांना टिम इंडियाच्या व्यवस्थापनाकडून दुय्यम वागणूक, पत्रकारांचा बहिष्कार

वर्ल्डकपमध्ये भारत आणि साऊथ आफ्रिकामध्ये ५ जून रोजी होणाऱ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतीय संघाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. पण भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने दिलेल्या दुय्यम वागणुकीमुळे या पत्रकार परिषदेवर सर्व माध्यमांनी बहिष्कार टाकला आहे.

बुधवारी भारतीय संघ वर्ल्डकपमधील पहिला सामना खेळणार आहे. त्यासाठी गेला आठवडाभर भारतीय खेळाडू कसून सरावही करत आहेत. वर्ल्डकपसाठी भारतीय संघाने किती तयारी केली आहे, गेम प्लॅन काय आहे या सगळ्याची माहिती देण्यासाठी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती.

पत्रकार परिषदेला संबोधित करायला भारतीय संघाचा एकही खेळाडू आला नाही. भारतीय संघ सराव करण्यात व्यस्त असल्यामुळे संघासोबत नेट प्रॅक्टिससाठी आलेले दोन गोलंदाज दीपक चाहर आणि आवेश खान पत्रकार परिषदेला संबोधित करतील अशी माहिती संघाच्या व्यवस्थापनाने पत्रकारांना दिली. हे दोघंही यावेळी वर्ल्डकप खेळणार नसून केवळ नेट प्रॅक्टिसमध्ये हातभार लावण्यासाठी इंग्लंडला आले आहेत. आता जे खेळाडू भारतीय संघाचा भागही नाही ते संघाच्या तयारीबद्दल काय उत्तरं देतील असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. पण तरीही यांनाच प्रश्न विचारा असं व्यवस्थापनाने सांगितलं

Loading...

वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनीच आमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला हवीत अशी भूमिका माध्यमांनी घेतली आणि पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला. नंतर ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे अशी सारवासारव भारतीय संघाला करावी लागली. संघातील एकही खेळाडू येणारही नव्हता तर पत्रकार परिषद घेण्याची काहीच गरज नव्हती अशी चर्चा आता पत्रकारांच्या वर्तुळात सुरू आहे.

ब्लाॅग- गिरीश, पुढील महिन्यात तुझ्या नावापुढे “आशियाई गेम्स गोल्ड मेडलिस्ट” लागावं

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.