‘बस्स झालं आता, ईडीच्या विरोधात उठाव करावाच लागेल’; छगन भुजबळ आक्रमक

मुंबई : भाजपाकडून महाविकास आघाडीतील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून टार्गेट करण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून भाजपाला खडेबोल सुनावले होते. राऊतांपाठोपाठ शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपाला सर्वच मंत्र्यांनी प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. भास्कर जाधव यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं होत.

यानंतर आता अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देखील यावर वक्तव्य केलंय. पूर्वी जी नावे कुणाला फारशी माहिती नव्हती, ती आता पोरासोरांच्या तोंडी आहेत, ती म्हणजे ईडी, सीबीआय, एनसीबी. धक्कादायक म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांच्या आधीच भाजप नेत्यांना माहिती असते की, पुढील कारवाई कुणावर होणार आहे. आता बस्स झाले. ईडीच्या विरोधात उठाव करावाच लागेल, असं भुजबळ म्हणाले.

तसेच ईडी, सीबीआय, एनसीबी ही नावे लहान मुलांना देखील माहित आहेत. ईडीच्या सर्व कारवाया राजकीय आहेत. फक्त आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवरचं छापे घातले जात आहेत. आजवर ईडीने ज्या- ज्या कारवाया केल्या त्याचा कोणताही तपशील नाही. त्यामुळे केवळ राजकीय आकसापोटी भाजप नेते ईडीचा गैरवापर करत आहेत, असं म्हणतं छगन भुजबळ यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा