InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदींची सत्ता गेल्यास ‘हा’ मुख्यमंत्री होऊ शकते देशाचा उपपंतप्रधान?

लोकसभा निकालानंतर देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास भाजप व्यतिरिक्त तयार झालेल्या महायुतीला पाठिंबा देण्यासाठी आपण तयार असल्याचा इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. मात्र त्यासाठी केसीआर यांनी उपपंतप्रधानपदाची अट घातली असून त्यासाठी हालचाल सुरू केली आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपण विरोधकांसोबत संपूर्ण सक्रीय सहभाग देण्यास तयार आहोत. मात्र यासाठी आपली एक अट असून विरोधाकांनी आपल्याला उपपंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करावे, असेही केसीआर यांनी सांगितले.

21 मे रोजी दिल्लीत विरोधकांची बैठक होणार असून त्या बैठकीला देखील केसीआर उपस्थित राहणार आहेत. केसीआर यांची मागणी काँग्रेस नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. तर काँग्रेसने केसीआर यांच्या फॉर्म्युल्यावर बोलण्यास नकार दिला आहे. या सर्व बाबींवर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच चर्चा करण्यात येईल, असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपपंतप्रधान पदासाठी केसीआर विरोधकांमध्ये सक्रीय झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.