InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

संपुर्ण यादी- असे आहेत कबड्डी मास्टर्स दुबई २०१८ स्पर्धेतील सर्व संघांचे खेळाडू

- Advertisement -

22 जून पासून कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धेक ६ पैकी ६ संघानी आपल्या ताफ्यातील खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

या स्पर्धेचा सलामीची सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पार्ध्यांमध्ये होणार आहे. विश्वविजेत्या भारतीय संघासाठी ही स्पर्धा आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एशियन गेम्सच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

कारण या कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धेत आशियातील 4 मोठे देश खेळणार आहेत. यात भारतासह, इराण, दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान या आशियाई देशांचा समावेश आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डीचा प्रसार होण्यासाठी केनिया व अर्जेंटीना या दोन आशिया खंडाच्या बाहेरील संघाचाही यास्पर्धेत समावेश केला आहे.

कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धेसाठी दोन गटात संघांची विभागणी करण्यात आली आहे. यात भारत अ गटात असुन पाकिस्तान आणि केनिया हे दोन देशही या गटात असणार आहेत. तसेच ब गटातून इराण, दक्षिण कोरिया आणि अर्जेंटीना खेळतील.

प्रत्येक संघ आपल्या गटातील प्रत्येक संघाशी साखळी फेरीत प्रत्येकी दोन सामने खेळेल. त्यानंतर प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. या स्पर्धेसाठी विश्वविजेत्या भारतीय संघाकडून सर्वांनाच मोठी आपेक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

भारतीय संघात चांगले आक्रमण करणारे खेळाडू आहेत. यात दिपक निवास हुडा, परदिप नरवाल, मोनू गोयत, रिशांक देवाडिगा आणि राहुल चौधरी हे रेडर्स आहेत. तर बचाव फळीत सुरेंदर नाडा आणि गिरीश एर्नाक महत्त्वाची कामगिरी बजावतील. त्याचबरोबर भारताचा कर्णधार असलेल्या अजय ठाकूरचीही कामगिरी महत्त्वाची ठरेल.

मात्र सर्वांना आश्चर्य वाटले आहे ते इराणने त्यांच्या संघातून फजल अत्रचली आणि अबोझार मीघानीला वगळल्याचे. या दोघांना यावर्षीच्या प्रो कबड्डीसाठी झालेल्या लिलावात अनुक्रमे 1 कोटी आणि 76 लाख रूपयांची बोली लागली आहे.

तसेच मेराज शेख हा महत्त्वाचा खेळाडूही इराण संघात स्थान मिळवण्यास अपयशी ठरला आहे.

त्याचबरोबर दक्षिण कोरियाच्या संघातील जॅन्ग कुंग ली आणि प्रतिभाशाली डेव्हिड मोसाम्बाईवर यांची कामगिरी त्यांच्या संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

असे आहेत कबड्डी मास्टर्स दुबई 2018 चे संघ:

- Advertisement -

भारत: गिरीश मारुती एर्नाक, सुरेंद्र नाडा, संदीप, मोहित चिल्लर, राजू लाल चौधरी, सुरजित, दीपक हुडा, परदीप नरवाल, राहुल चौधरी, रिशांक  देवाडिगा, मोनू गोयत, रोहित कुमार, अजय ठाकूर, मनजीत चिल्लर

दक्षिण कोरिया: ली डाँग जिओन, इओम ताई देओक, ली जेए मीन, जॅन्ग कुंग ली, हाँग डाँग ज्यू, किम डाँग ग्यू, पार्क चॅन सिक, जो जा पिल, किम सोंग रेओल, पार्क ह्यून इल, किम ग्यूंग ते, को याँग चाँग.

पाकिस्तान: नासीर अली, वकार अली, मुदस्सर अली, कासीर अब्बास, काशिफ रजाक, मोहम्मद नदीम, सज्जाद शौकत, मुहम्मद इमरान, मोहम्मद सफियन, आबिद हुसैन, अखिल हुसैन, वासिम सज्जद, मुहम्मद निसार, मुजम्मल हुसेन.

इराण: हादी ताजिक, मोहम्मद अमीन नोसरी,अमीरहुसेन मोहम्मद मालेक, मोहम्मद इस्मायिल नबीबाक्ष, मोहम्मद घोरबानी, मोहम्मद इस्मायिल माघसूदलो माहली, मोहम्मद काझिम नासेरी, मोहम्मदरेझा शद्लोवी चिएनह, इमाद सेदघाटनिआ, अफ्शिन जाफरी, मोहम्मद ताघी पाएन माहली, मोहम्मद मालक, सैयद गफरी, हमीद मिर्झाई नादेर.

अर्जेंटीना: फेडरिको ग्रामजो, राफाईल असेवडो, गाब्रिरील सच्ची, मारीआनो पासकल, जॉर्ज बरझा, सेबीएस्टीआन डेसेसीओ, रोमन सेसारो, नाहूएल लोपेज, जविअर कॅमेरा, इव्हान मोलीना, फ्रॅंको कास्टो, मार्टिआझ मारटीनेझ, सेबीस्टीआन कॅनसिया, नाहूएल विल्लामायोर

केनिया: डेव्हिड मोसाम्बाई, ओगक ओधीएन्बो, क्रिस्पीन ओटिनो, ओबिरो व्हिक्टर, ओबिलो जेम्स, एरिक ओचींग ओडोर, निकोलस मुटुआ, एम्बुगा जॉर्ज, एल्फोसा ओटिनीओ, जेम्स कमवेटी, पॅट्रिक एनझोइयाक नोरोजे, एसा ओटिएनो, केविन वायर

महत्त्वाच्या बातम्या:

दादा संघाची गेल्या ३४ वर्षातील आयसीसी क्रमवारीतील सर्वात निचांकी घसरण तर टीम इंडिया

केसाने कापला होता या दिग्गज भारतीय फलंदाजाचा गळा!

रशियातील फिफा विश्वचषकासाठी या भारतीयाने काढले तब्बल 15 लाखांचे कर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.