InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

तीन दिग्गज खेळाडूंशिवाय कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत खेळणार इराण

कबड्डी मास्टर्स दुबई 2018 ची स्पर्धा 4 दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या संघानी स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे.

पण सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे ते विश्वचषकातील उपविजेता इराण संघातून फजल अत्रचली आणि अबोझार मीघानी या महत्त्वाच्या खेळाडूंना वगळले आहे. या दोघांना यावर्षीच्या प्रो कबड्डीसाठी झालेल्या लिलावात अनुक्रमे 1 कोटी आणि 76 लाख रूपयांची बोली लागली आहे.

अत्रचली आणि अबोझार यांच्याबरोबरच मेरज शेखलाही संघात स्थान देण्यात आलेले नाही.

२२ आॅक्टोबर २०१६ रोजी कबड्डी जगतातील सर्वात महत्त्वाची स्पर्धेत अर्थात कबड्डी विश्वचषकात हा संघ भारताविरुद्ध अंतिम सामना खेळला होता. त्यात त्यांना ३८-२९ असे पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु कबड्डी विश्वातील एक मोठा संघ म्हणुन या संघाकडे या स्पर्धेनंतर पाहिले जाऊ लागले.

कबड्डीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या स्टार खेळाडूंचा समावेश या संघात आहे. २०१६ विश्वचषकात भारत आणि पोलंड सोडून इराणने अनेक संघांचा धुव्वा उडवला होता. तेव्हा हा संघ ब गटात ५ पैकी ४ सामने जिंकला होता तर उपांत्य फेरीत कोरियावर विजय मिळवत अंतिम फेरीत भारताकडून पराभूत झाला होता.

या स्पर्धेत इराणसह भारत, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, केनिया आणि अर्जेंटीना या संघाचा समावेश आहे. 

कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धेसाठी दोन गटात संघांची विभागणी करण्यात आली आहे. यात भारत अ गटात असुन पाकिस्तान आणि केनिया हे दोन देशही या गटात असणार आहेत. तसेच ब गटातून इराण, दक्षिण कोरिया आणि अर्जेंटीना खेळतील.

प्रत्येक संघ आपल्या गटातील संघाशी साखळी फेरीत प्रत्येकी दोन सामने खेळेल. त्यानंतर प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

असा आहे इराणचा संघ : हादी ताजिक, मोहम्मद अमीन नोसरी,अमीरहुसेन मोहम्मद मालेक, मोहम्मद इस्मायिल नबीबाक्ष, मोहम्मद घोरबानी, मोहम्मद इस्मायिल माघसूदलो माहली, मोहम्मद काझिम नासेरी, मोहम्मदरेझा शद्लोवी चिएनह, इमाद सेदघाटनिआ, अफ्शिन जाफरी, मोहम्मद ताघी पाएन माहली, मोहम्मद मालक, सैयद गफरी, हमीद मिर्झाई नादेर.

महत्त्वाच्या बातम्या:

अर्जेंटीनाचा दिग्गज माजी फुटबॉलपटू दिओगो मॅरेडोना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

चेतेश्वर पुजारा करावे तेवढे कौतुक कमीच, क्रिकेटप्रती असलेले प्रेम पुन्हा दिसुन आले!

दादा संघाची गेल्या ३४ वर्षातील आयसीसी क्रमवारीतील सर्वात निचांकी घसरण तर टीम इंडिया…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.