InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘कबीर सिंग’ चित्रपटाची बॉक्स ऑफिस कमाईत वाढ

'भारत', 'केसरी', 'टोटल धमाल' आणि 'गली बॉय' या चित्रपटांच्या तुलनेत कबीर सिंगची कामगिरी चांगली

मुंबई : आव्हानात्मक भूमिकांची निवड करत त्या तितक्याच कातदीने साकारण्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता शाहिद कपूर सध्या चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील अभिनयामुळे शाहिदची सर्वच स्तरांतून प्रशंसा करण्यात येत आहे. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असूनही कमाईचे आकडे मात्र वेगळंच चित्र सर्वांसमोर ठेवत आहेत.

‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या ‘कबीर सिंग’मध्ये शाहिद मध्यवर्ती भूमिकेत झळकत आहे. कियारा अडवाणी त्याच्यासोबत चित्रपटातून स्क्रीन शेअर करत आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे मोठ्या वेगाने पुढे जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

शाहिद कपूरच्या करिअरला वेगळीच कलाटणी देणाऱ्या कबीर सिंगला फक्त आठवड्याच्या शेवटीच नव्हे तर, आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच ऐन व्यग्र वेळापत्रकाच्या दिवसांमध्येही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply