“संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय”; मनसे नेते गजानन काळेंचा निशाणा!

मुंबई : येत्या 5 जूनला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र आता राज ठाकरे यांचा 5 जून रोजी होणार अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाला आहे. राज ठाकरेंनी स्वत: ट्विट करत तूर्तास दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. यानंतर आता यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती.

राऊत म्हणाले कि, मला माध्यमांकडून कळलं की त्यांनी ते रद्द केले, ५ जूनचे कार्यक्रम. पण ५ जूनच्या कार्यक्रमासाठी काही सहकार्य हवं असतं तर आम्ही त्यांनी केलं असतं. अयोध्येत शिवसेनेचं नेहमीच स्वागत केलेलं आहे, तिथे शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे, असंही राऊत म्हणाले होते.यानंतर आज पुण्यात राज ठाकरे यांची सभा पार पडत आहे.

या सभेत बोलताना मनसे नेते गजानन काळे यांनी जोरदार टोला लगावला. नए नए मुख्यमंत्री ने अपने ड्रायव्हरसे कहा…आज कार हम चलाएंगे..ड्रायव्हर बोला, हम उतर जाएंगे..चलाकर तो देखिए, आप की आत्मा हिल जाएगी..यह कार है, सरकार नहीं जो भगवान के भरोसे चल जाएगी…असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तसेच पुढे संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय. एका सिनेमात कादर खानला रातांधळेपणा होता. संजय राऊतांना दिवसांधळेपणा झालाय. काहीही झालं की ते बोलत सुटतात, असं काळे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा