Kailas Patil | “बाबा…”, कैलास पाटलांच्या मुलीच्या हट्टाने सर्वांनाच केलं भावूक

Kailas Patil | मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेते कैलास पाटील (Kailas Patil) आमरण उपोशनावर आहेत. यावेळी त्यांच्या मुलीने संबंधित ठिकाणी जावून वडिलांना घरी चलण्याचा हट्ट केला. या क्षणी थोडा वेळ तेथील वातावरण भावूक झालं होतं. राज्य शासनाकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी मागच्या सहा दिवसांपासून कैलास पाटील आमरण उपोषण आंदोलनावर आहेत.

या उपोषण स्थळी त्यांची मुलगी आराध्या व पुतणी राजेश्वरी ह्या आल्या त्यानंतर एक भावनिक वातावरण झाले होते. मुलगी व बापाचे नाते किती घट्ट असते हे यावेळी पाहायला मिळाले. आंदोलनातून चला असे म्हणत या दोघींनी अनेक वेळा आमदार पाटील यांचे हात ओढले त्यानंतर गळयात पडून गालावर पपी घेतली.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. माझ्या उपोषणामुळे जर शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळणार असतील तर मी हे उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यानंतरच मी उपोषण थांबवेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे. काल एका दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब देखील त्यांनी सांगितली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.