Kalicharan Maharaj | “डुकराच्या दाताचे पाणी मुलीला प्यायला द्या, मग बघा…”; कालीचरण महाराजांचं अजब वक्तव्य

Kalicharan Maharaj | अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून देशात सध्या लव्ह जिहाद प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. लव्ह जिहाद व सक्तीचे धर्मांतरणविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी काल अहमदनगर जिल्हा सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) आणि गुजरातमधील काजलदीदी हिंदुस्थानी यांनी केले होते. या मोर्चानंतर झालेल्या सभेत कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

“देशात रोज ४० हजार लव्ह जिहादची प्रकरणे होतात. यासाठी वशीकरण व जादूटोण्याचा वापर केला जातो. आता याच्यावर उपाय काय तर त्यासाठी डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलीला प्यायला द्या मग बघा डोकं ठिकाणावर येईल. सर्व भूत, प्रेम, तंत्र मंत्र बाहेर येईल, असा अजब दावा कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केला आहे.

वशीकरण व जादूटोण्याचा वापर लव्ह जिहादसाठी केला जातो. भूतपिशाच्च नाही असे अनेकजण म्हणतात. मग हनुमान चालिसामध्ये भूतपिशाच्चचा उल्लेख कसा?, असा सवाल त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, “हिंदू धर्मात पुनर्जन्म सिद्धांत, कर्मफल सिद्धांत व मनोविज्ञान आहे. अन्य कोणत्याही धर्मात ते नाही. गजवा-ए-हिंदच्या नावाखाली मागील ८०० वर्षांपासून भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”

सर्व आतंकवादी मुस्लिमच आहे, ५ लाख मंदिर फोडली होती, सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते तर हिंदू राष्ट्र झालं असत असंही कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचा नाही तर हिंदूंचा राजा आहे. त्यामुळे प्रांतवाद व जातीवाद सोडा आणि हिंदू म्हणून एक व्हा, असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हंटलंय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.