Kalicharan Maharaj | “सत्तेसाठी हिंदूंचा विश्वासघात केल्यानेच नावही गेलं अन् चिन्हही”; कालिचरण महाराजांची ठाकरेंवर जहरी टीका

Kalicharan Maharaj | पुणे : अनेकविध कारणांनी वादात राहिलेल्या कालिचरण महाराजांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, “हिंदू कट्टरवादासह देशातील आणि राज्यातील राजकीय स्थितीवरही भाष्य केलं आहे. हिंदूंचा विश्वासघात केल्यानेच पक्षाचं नावही गेलं आणि चिन्हही असं कालिचरण महाराज म्हणाले. तसेच, हिंदूंचा विश्वासघात करून उद्धव ठाकरेंनी स्वत: चा सत्यानाश केला आहे”, असे कालिचरण महाराज म्हणाले आहेत. कालिचरण महाराजांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंच्या राजकीय परिस्थितीवरही टीका केली आहे.

Kalicharan Maharaj Comment on Uddhav Thackeray 

“जो पक्ष हिंदु हिताचं काम करेल त्या पक्षाला आम्ही मत देऊ. मग तो पक्ष कोणताही असो, शिवसेना, काँग्रेस, भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, जो हिंदुहिताचं काम करेल त्यांनाच आम्ही मत देऊ”, असे कालिचरण महाराज म्हणाले आहेत.

हातून नावही गेलं, निवडणूक चिन्हही गेलं”

“नावही गेलं हातून, निवडणूक चिन्हही गेलं हातून. सत्तेसाठी हिंदूंचा विश्वासघात केल्याचे परिणाम आहेत हे . सत्तेसाठी इटालियन बार्बलाच्या पायात झोपले. हिंदूंच्या विरोधात असणाऱ्यांशी हातमिळवणी केली. स्वत:च्या तत्वांना पायदळी तुडवलं. आणि सत्यनाश करुन घेतला. आता निवडणुकीत काहीतरी करुन दाखवा. सर्व हिंदू आपल्या विश्वासघाताचा बददला घेणार”, असे कालिचरण महाराज म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.