केसरी कुस्ती स्पर्धेत कालीचरण सोलनकर यांना सुवर्णपदक

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि  अमनोरा तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हळूंगे-बालेवडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे  पार पडले.
गादी विभागातील ७० किलो वजनी गटात अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या कालीचरण सोलनकर याने पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीवर ११-५ गुणांनी सहज विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. अहमदनगरच्या विकास गोरेने लातूर जिल्ह्याच्या अलिम शेखवर १५-३ ने सहज विजय मिळवत कांस्य पदक जिंकले. याच गटाच्या कांस्यपदकाच्या दुसर्‍या लढतीत पिंपरी चिंचवडच्या योगेश्वर तापकिरने औरंगाबादच्या कृष्णा गवळीवर १०-० अशा तांत्रिक गुणधीक्याने विजय मिळवला.

मंजू राणीचेही रौप्यवर समाधान

८६ किलो गादी विभागात सोलापूर जिल्हयाच्या वेताळ शेळकेने जालन्याच्या बाबासाहेब चव्हाण वर ८-० गुणांनी विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. बाबासाहेब चव्हाण यांनी औरंगाबाद शहराच्या संदेश डोंगरेवर ७-१ ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसर्‍या उपांत्य फेरीत वेताळ शेळके सोलापूर व रमेश कुकडे यांच्यात लढत झाली.

वेताळ शेळके यांनी ५-० गुण घेत अंतिम फेरी गाठली. धुळ्याच्या हर्षल गवते व रमेश कुकडे यांनी कांस्य पदक पटकावले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.