Kamal Haasan | सुपरस्टार कमल हसन यांची प्रकृती खालावली, चेन्नईतील रुग्णालयात उपचार सुरू

चेन्नई: सध्या एकीकडे बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण त्यांची पत्नी वृषाली गोखले (Vrushali Gokhale) यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम गोखले यांना हृदय आणि किडनीशी निगडित समस्या जाणवत असून त्याचे सर्व अवयव निकामी झाले आहे. तर दुसरीकडे साउथ सुपरस्टार कमल हसन (Kamal Haasan) यांची प्रकृती खालावल्याची वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमल हसन यांना बुधवारी ताप आला होता. त्यानंतर त्यांना चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. चाचण्यानंतर डॉक्टरांनी कमल हसन यांना पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र याबद्दल कमल हसन यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही.

रिपोर्टनुसार, बुधवारी कमल हसन हैदराबाद वरून परत येत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यावेळी त्यांना अस्वस्थता जाणवायला लागली होती आणि नंतर ताप आला होता. हैदराबादवरून परतल्यानंतर त्यांना लगेचच चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, कमल हसन यांना आज सकाळी डिस्चार्ज मिळाल्याची माहिती देखील मिळत आहे. पण अद्यापही त्यांच्या विषयी त्यांच्याकडून किंवा त्यांच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीत.

सुपरस्टार कमल हसन सध्या त्यांच्या आगामी चित्रपट ‘इंडियन 2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक शंकर यांनी केले आहे. चित्रपटाच्या शूटिंगसह कमल हसन ‘बिग बॉस तमिळ’चे 6 वे सीजन होस्ट करण्यामध्ये देखील व्यस्त आहे. व्यस्त दिनचर्यामुळे आणि सततच्या शूटिंग आणि प्रवासामुळे त्यांना कदाचित ताप आणि थकवा जाणवून त्यांची प्रकृती खालावली होती.

कमल हसन शेवटी ‘विक्रम’ या चित्रपटांमध्ये दिसले होते. त्यांचा हा चित्रपट 3 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमध्ये कमल हसन सोबत विजय सेतुपती, सुपरस्टार सुरिया कॅमिओ आणि फहाद फासिल हे कलाकार होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

महत्वाच्या बातमी 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.