मिकाच्या ‘KRK कुत्ता है’ गाण्यावर भडकला कमाल खान; मिकाला दिली धमकी

मुंबई : अभिनेता कमाल आर. खान काही दिवसांपासून सतत चर्चेत पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी केआरके आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. हे भांडणं मिटते की नाही तेवढ्यात आता गायक मिका सिंगने केआरकेवर ‘कुत्ता खान’ म्हणत गाणं काढले आहे. यामुळे आता मिका आणि केआरके या दोघांमध्ये वाद सुरु झाला आहे.

बुधवारी मिकाने केआरके कुत्ता असे गाण्याला नाव देत गाण्याच्या टिझर प्रदर्शित केला. मिकाच्या एका फॅन क्लबने ‘केआरके कुत्ता है’ या गाण्याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “मित्रांनो हे गाणं कसं वाटलं,” अशा आशयाचं ट्वीट केलं आहे. मिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

यावर मिकाला प्रत्युत्तर देत केआरकेने एक ट्वीट केले आहे. “एवढा काय भुकतोस, पुढे येऊन गाणं प्रदर्शित करण्याची हिमत्त नाही? घाबरू नकोस, संकोच न करता कर! माझी इच्छा आहे की तू फक्त एकदा हे गाणं प्रदर्शित कर! मग बघ!,” असे ट्वीट करत केआरकेने मिकाला धमकी दिली आहे. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर या दोघांमध्ये काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष आता लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा