InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कमलनाथ यांनी घेतला राज ठाकरेंचा आदर्श..? पाहा काय म्हणाले ?

काँग्रेसचे नेते कमलनाथ सिंह यांनी काल मध्यप्रदेशात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फाईलवर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला.

आता तर कमलनाथ यांचे एक वेगळेच रूप लोकांना पाहायला मिळाले. कमलनाथ यांनी राज ठाकरेंकडून गुरुमंत्र घेऊन त्याचा गंडा बांधला की काय असा प्रश्न  पडावा असे कमलनाथ बोलू लागले आहेत. मुख्यमंत्री होताच कमलनाथ यांनी उद्योजकांना इशारा दिलाय की खबरदार बिहारचे कामगार आणाल तर !

उद्योजकांनी ८० टक्के  नोकऱ्या स्थानिक युवकांनाच दिल्या तर ठीक आहे नाही तर आम्ही राज्य सरकारकडून दिली जाणारी सबसिडी आणि इतर सवलती देणार नाही ! आमची  सबसिडी   घेता आणि नोकऱ्या  बिहार आणि बाहेरच्या प्रांतातून येणाऱ्या लोकांना देता हे खपवून घेतले जाणार नाही , असा दमच कमलनाथ यांनी जाहीरपणे उद्योगपतींना भरला आहे .

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply