InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘त्याने’ तब्बल 24 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा केला विश्वविक्रम

नेपाळमधील कामी रिता शेर्पा या वाटसरूने तब्बल 24 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विश्वविक्रम केला आहे. मागील आठवड्यातच 23 व्यांदा शिखर सर केले होते, काल पुन्हा एकदा शिखर सर करत विक्रम केला आहे.

मागील दोन दशकांहून अधिक काळापासून एव्हरेस्टवर जाणाऱ्या गिर्यारोहकांना वाट दाखवण्याचे काम करणाऱ्या रिता यांनी सर्वात आधी १९९४ साली एव्हरेस्टचे ८ हजार ८४८ मीटर उंचीचे शिखर सर केले होते. त्यानंतर मागील २५ वर्षांमध्ये रिता यांनी ३५ हून अधिक वेळा ८ हजार मीटरहून अधिक उंचीची शिखरे सर केली आहेत. ४९ वर्षाच्या रिता यांनी यशस्वीरित्या सर केलेल्या शिखरांच्या यादीमध्ये पाकिस्तानमधील के टू या शिखराचाही समावेश आहे. के टू हे जगातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे.

एव्हरेस्ट चढण्याचा विक्रम आहे हे मला ठाऊक नव्हते. मी केवळ गिर्यारोहकांना वाट दाखण्याचे माझे काम करतो. मी विक्रमांसाठी चढाई करत नाही, असे रिता यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply