कंगनाने सुरू केली जयललिता यांच्या बायोपिकची तयारी

अभिनेत्री कंगना राणावत तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिक मध्ये काम करत आहे. त्यासाठी ती प्रोथेस्टिक यांच्या मोजमापासाठी लॉस एंजलिसला रवाना झाली आहे. तिचा ह्या सेशनचा फोटो तिच्या सोशल मीडिया हॅण्डल करणाऱ्या टीमने सोशल मीडियावर शेयर केला आहे. या सिनेमाचं नावं थैलवी असून दिवाळीत सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

कंगनाचे चार सेशन होणार असून हे सेशन जेसन कॉलिन्स यांच्या स्टुडिओ मध्ये होत आहेत. हॉलिवुड एक्स्पर्ट जेसन याने आतापर्यंत कॅप्टन मार्वेल, ब्लड रनर 2049 आणि हंगर गेम्स या सिनेमांसाठी प्रोथेस्टिक मेकअप केलेले आहेत.

कांगनाने एकदा मुलाखतीत म्हटल होत की, ह्या प्रोसेससाठी मी प्रचंड उत्सुक असून मला नाही माहित की या सर्वांचा माझ्या एक्स्प्रेशनवर काय परिणाम होईल पण हा माझ्यासाठी बेस्ट अनुभव असेल. या सिनेमाचं दिग्दर्शन ए ल विजय करणार असून सिनेमाचं पहिलं शेड्युल मैसूर येथे सुरू होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगु भाषेत रिलीज होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.