कंगनाने केली शाहरुखसोबत स्वत: ची तुलना

कंगना रणौत सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना आपलं मत व्यक्त करत असते आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेतही राहत असते. आता कंगनाने एक ट्वीट करत तिची आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची यशाची कहाणी सांगत त्यांच्या प्रवासाची तुलणा केली आहे.

“१५ वर्षांपूर्वी आज ‘गॅंगस्टर’ प्रदर्शित झाला होता. शाहरुख खानजी आणि माझी आतापर्यंतची सर्वात मोठी यशोगाथा आहे. पण शाहरुख हे दिल्लीचे होते, कॉन्व्हेंटमधून शिक्षण घेतलं होतं आणि त्यांचे आई-वडील हे चित्रपटसृष्टीत सक्रिय होते, मला इंग्रजीचा एक शब्दसुद्धा येत नव्हता, शिक्षण नाही, हिमाचल प्रदेशमधील एका दुर्गम गावातून आले होते,” अशा आशयाचे ट्वीट करत कंगनाने शाहरुख खान आणि तिच्या यशोगाथेची तुलणा केली आहे.

‘गॅंगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘गॅंगस्टर’मध्ये कंगनाने सिमरनची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासूने केले होते. या चित्रपटात कंगनासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता इम्रान हाश्मी आहे. हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला असून महेश भट्ट हे या चित्रपटाचे निर्माते होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.