बीफ खाण्याच्या वक्तव्याबद्दल कंगनाला उच्च न्यायालयाकडून क्लिन चीट

अभिनेत्री कंगना राणौतला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कंगनाला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून क्लिन चीट मिळाली आहे. हे प्रकरण कंगनाने बीफ खाण्याशी संबंधित केलेल्या ट्विटशी जोडले गेलेले आहे. कंगनाच्या विरोधात लुधियाना राहणाऱ्या नवनीत गोपी यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यांनी म्हटलं की,’कंगना आपल्या वक्तव्यातून बीफला प्रमोट करत आहे. ज्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक भावना दुखावल्या आहेत.’ यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयाने म्हटलंय की, ‘असं अजिबातच वाटत नाही की, कंगना गो मासला प्रमोट करत आहे. कंगनाची पोस्ट वाचून असं कळतं की, कंगना स्वतः शाकाहारी आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये कंगना भारत आणि परदेशात खाण्याच्या फरकावर बोलत आहे. आता ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंगनाने ती पोस्ट व्हायरल केल्याचं वाटत नाही.’ न्यायालयाने पुढे म्हटलं की,’फॅक्ट आणि परिस्थितीनुसार कंगनाने कुठेही गुन्हा केल्याचं स्पष्ट होत नाही.’

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.