Kangana Ranaut | कंगना रनौत करणार सोशल मीडियावर कमबॅक?, म्हणाली…
मुंबई: बॉलीवूड Bollywood सुपरस्टार कंगना रनौत Kangana Ranaut नेहमी तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत राहते. सध्या कंगना रनौत ट्विटर Twitter वर खूप चर्चेत आहे. कंगनाचे चाहते तिची ट्विटरवर परतण्याची वाट बघत आहे. दरम्यान, ट्विटरवर तिच्या नावाचा ट्रेंड देखील सुरू झाला आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कंगनाने सांगितले आहे की, जर तिचे ट्विटर अकाउंट रिस्टोर झाले तर ती ट्विटरवर परत येईल का?
लॉकडाऊनच्या काळामध्ये कंगना रनौत ट्विटरवर खूप जास्त सक्रिय होती. दरम्यान, तिच्या त्यावरच्या पोस्टमुळे रोज काही ना काही वाद होऊन कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण व्हायची. कंगनाच्या या कॉन्ट्रोवर्सी मुळे काही महिन्यानंतर तिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या धोरणांचे उल्लंघन केले असे सांगून तिचे अकाउंट बंद करण्यात आले. तर सध्या इलॉन मास्क ने ट्विटरचा ताबा आपल्याकडे घेतल्यानंतर कंगनाच्या ट्विटरवर पुनरगमनाची चर्चा सुरू झाली आहे.
कंगना रनौत Kangana Ranaut करणार का ट्विटरवर कम बॅक ?
लॉकडाऊन दरम्यान कंगना ट्विटरवर खूप सक्रिय असल्यामुळे तिचे ट्विटर सोबत लव अफेअर सुरू आहे, अशी चर्चा सर्वत्र पसरली होती. सध्या इलॉन मास्कने ट्विटर टेकओवर केल्यानंतर कंगनाची ट्विटरवर नव्या इंनिंगला सुरुवात होऊ शकते का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर देत कंगना म्हणाली की, ” मी एक वर्ष ट्विटर वापरत होते पण ट्विटर मला एक वर्षही सहन करू शकले नाही, विचार करा लोक दहा-दहा वर्ष ट्विटर वापरत आहे.”
त्याचबरोबर कंगना म्हणाली आहे की, “माझे ट्विटर अकाउंट जर रिस्टोर झाले तर तुम्हाला नक्कीच त्यावर काहीतरी मसाला मिळेल. तुम्ही इंस्टाग्राम वर तुमचे फोटो शेअर करू शकतात तर ट्विटरवर तुमचे विचार तुम्ही मांडू शकता. इंस्टाग्रामवर आपल्याला दिवसभर संवाद साधता येत नाही पण आपण ट्विटरवर दिवसभर संवाद साधू शकतो. ट्विटरवर अधिक लोकांना चर्चेत सामील होता येते. ट्विटरवर होणारी ही चर्चा फक्त एक मनोरंजन आहे. पण ही मजा कधी कधी गंभीर होऊन बसते.”
महत्वाच्या बातम्या
- Ambadas Danave | कडू-राणा वादावर अंबादास दानवेंचं वक्तव्य, म्हणाले…
- New Project | अनेक प्रकल्प बाहेर जात असतानाच महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, अॅमेझाॅन कंपनीने केली ठाण्यात गुंतवणूक
- Maharashtra Winter Update | राज्यात थंडीचा कडाका, तर पुण्यामध्ये तापमानाचा पारा 12.6 अंशावर
- Supriya Sule | “जनाची नाही तर मनाची ठेवा”, टाटा एअरबस प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
- Amol Mitkari | “माझ्या जिवाचं काही बरं वाईट झालं, तर…”; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला इशारा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.