Kangana Ranaut | मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायमच आपल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. तर आता एका मुलाखतीदरम्यान कंगना रनौतने मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल असं वक्तव्य केलं आहे . याचप्रमाणे तिने तिच्या मुंबई महापालिकेने पडलेल्या मुंबईतील घराचा उल्लेख देखील करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मला राजकारणात प्रवेश करायला नक्की आवडेल : कंगना रनौत
मुलाखतीदरम्यान कंगना रनौत म्हणाली की, मला सुरुवातीपासूनच समाजकार्य करायला आवडत. तसाच मला राजकारणाची देखील आवडत आहे. यामुळे जर मला राजकीय कोणत्याही पक्षाने संधी दिली तर मी राजकारणात प्रवेश करेल. याचप्रमाणे देशाचा विचार करुन, “देशाला माझी गरज असेल तर मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल” हे वक्तव्य कंगनाने केलं आहे. तसचं मी राजकारणात काम करण्यासाठी पात्र आहे की नाही हे जनता ठरवेल. पण मी अभिनय आणि राजकीय क्षेत्रात झोकून काम करेल. असं कंगना म्हणाली.
(I would definitely like to enter politics: Kangana Ranaut)
दरम्यान, कंगनाने नाव न घेता उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे. मला अनेक लोक चुकीच समजतात. काहीही बोलते म्हणतात परंतु, मी कोणत्या व्यक्तीची बाजू घेत नाही. माझं नुकसान होत असलं तरी देशाचा विचार करुन एखाद्या गोष्टीवर मी व्यक्त होत असते. माझं मत अनेकांना खटकतं. माझी लढाई एखाद्या व्यक्तीसोबत नसून त्या व्यक्तीच्या विचारांसोबत आहे. ज्यावेळी माझं मुंबईमधील घर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाणे पडलं तेव्हा मात्र त्यांनी हातातल्या सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत माझं घर पाडल. अशा प्रकारे माझं घर पडलं जाईल याचा विचार देखील मी केला नव्हता. असं म्हणत कंगनाने ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Asim Sarode | कुणाची राजकीय समीकरणे बळकट होऊ द्यायची, कुणाची खिळखिळी करायची यासाठी सरकारी यंत्रणा – असीम सरोदे
- Nitesh Rane | “सर्व काही खोक्यांसाठी चालू आहे” ; नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- Rohit Pawar | देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची भीती आम्हाला नाही; तर ती एकनाथ शिंदेंना आहे : रोहित पवार
- Uddhav Thackeray | “शिंदेंची देशात गद्दार म्हणून ओळख…” ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- Sanjay Raut | “हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना रोखून दाखवा” : संजय राऊत