Kangana Ranaut । कंगना रानौतचा दिलदारपणा; नुकसान भरपाईसाठीचे करदात्यांचे पैसे नाकारले

Kangana Ranaut | मुंबई : 2020 मध्ये बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut) हीच मुंबईमधील घराचा काही भाग मुंबई महापालिकेने पाडला होता. त्यावेळी तीच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झालं होतं. तर माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कंगना रनौत असा शाब्दिक वाद देखील पेटला होता. तर आता कंगनाने एका मुलाखतीमध्ये तिच्या पाडलेल्या घराबद्दल पुन्हा एकदा विधान केले आहे.

काय म्हणाली कंगना रनौत (What did Kangana Ranaut say)

मुलाखतीदरम्यान कंगनाला प्रश्न विचारण्यात आला की, घराचा भाग जेव्हा पाडल्यात आला तेव्हा भरपाई मिळाली का ? त्यावर कंगनाने उत्तर दिलं की, मला कोणतीही भरपाई मिळालेली नाही, ते मला एक मूल्यांकनकर्ता (evaluator) पाठवणार होते. यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली. परंतु मीच त्यांना सांगितलं की, तुम्हीच मला मुल्यांकन करून पाठवा. करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग करणारे इतर कोणी मला नको आहेत. मला आणखी भरपाई नको आहे . याचप्रमाणे मला “न्यायालयाने सांगितले आहे की त्यांनी मला कितीही नुकसान भरपाई द्यावी, परंतु मी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधीही मूल्यांकनकर्त्यांना पाठवले नाही आणि मी मागणी केली नाही कारण मला करदात्यांच्या पैशाची माहिती आहे आणि मला त्याची गरज नाही.”अशी माहिती कंगनाने मुलाखतीदरम्यान दिली.

दरम्यान, कंगनाला 2020 मध्येच नोटीस बजावत आलं होतं. त्यानंतर एका दिवसात तिच्या घर-कार्यालयाचा काही भाग बेकायदेशीर बांधकामामुळे पाडण्यात आला. त्यामुळे तिने सत्तेत असणाऱ्या शिवसेनावर जोरदार संताप व्यक्त करत वक्तव्य केली होती. तसचं त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी त्यांची भांडणे देखील झाली यानंतर तिला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली. याचप्रमाणे तिने मुलाखतीमध्ये अनेक वक्तव्य केली आहे. तर ‘देशाला गरज असेल तर मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल’हे कंगनाचं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चत आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like