हाथरस प्रकरणावर कंगना राणावतचे मोठे वक्तव्य , म्हणाली…

उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजपला विरोधकांनी घेरलं आहे. तर, महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटले आहेत. राज्यात काँग्रेसकडून हाथरसच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनं होत असताना भाजपनं विरोधकांवर टीका केली आहे.अशातच मागील काही दिवसांपासून आपल्या बेताल वक्तव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावतने या घटनेवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

‘मला योगी आदित्यनाथ यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जसं प्रियांका रेड्डीच्या प्रकरणातील दोषींना ज्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला त्या ठिकाणी मारण्यात आलं त्याच प्रमाणं हाथरसच्या पीडितेलाही न्याय मिळायला हवा, ‘ असं कंगना राणावतने आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण देशातून आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा