‘नैराश्याचा धंदा करणाऱ्यांना…. ‘ कंगणाचा दीपिका पादुकोणवर जोरदार हल्ला

अभिनेत्री कंगणा राणावतने दीपिका पादुकोणवर निशाणा साधला आहे. माझ्या मागे बोला, नैराश्याचा धंदा करणाऱ्यांना जनतेने त्यांची लायकी दाखवली, असं टि्वट करत कंगणाने दीपिकावर टीकास्त्र सोडलंय.

अभिनेता सुशांतच्या मृत्यूनंतर दीपिका पादुकोणने आपल्या सोशल आकाउंटवरुन डिप्रेशन संबंधी काही पोस्ट केल्या होत्या. सुशांतने राहत्या घरी आत्महत्या केली असुन त्यावेळी तोही डिप्रेशनमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या मृत्यूनंतर दीपिकाने एक पोस्ट केली होती. त्यात माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, गुन्हेगार गुन्हा करतात. लोक आत्महत्या करत नाहीत तर ते आत्महत्येने मरतात, असं दीपिका म्हणाली होती.

दीपिकाने स्वत: नैरैाश्याचा सामना केलेला असल्यामुळे दीपिकाने ‘लाइव्ह लव्ह लाफ’ ही संस्था स्थापन केली आहे. मानसिक आजाराचा सामना करणाऱ्यांसाठी ही संस्था काम करते. यावरून दीपिका पदुकोण नैराश्याचा व्यवसाय करते, असं कंगणा म्हणाली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

डॉक्टरांनी वापरलेल्या ग्लोव्हजची धुवून पुन्हा होतेय विक्री ; मुंबईतील धक्कादायक प्रकार उघडकीस

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात चक्क आदित्य ठाकरे!

धक्कादायक-आणखी एका प्रसिद्ध कलाकाराची आत्महत्या ; बाथटबमध्ये आढळला मृतदेह

सुशांतबद्दलची पोस्ट करण जोहरला पडली भारी ; चाहत्यांनी केले ‘हे’ धक्कादायक काम

पुण्यात रुग्णवाहिकेचा ‘ढिम्म’ कारभार चव्हाट्यावर ; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा