कन्हैया कुमारने घेतली राहुल गांधींची भेट; काँग्रेसला तरुण नेतृत्व भेटण्याची शक्यता

मुंबई : सीपीआय नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी वादग्रस्त अध्यक्ष कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत आहेत. त्याने नुकतीच राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्याच्या पक्षप्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे कळते. एका राष्ट्रीय वृत्तपत्राच्या बातमीनुसार कन्हैया कुमारची सीपीआयमध्ये कोंडी झाली आहे. कन्हैयाच्या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा म्हणालेत की ‘मी पण या संदर्भात ऐकले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला तो आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित होता. त्याने भाषण केले आणि चर्चेत भागही घेतला. तसेच कन्हैया कुमारच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘कन्हैयाने मंगळवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि दोघांनी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा केल्याचे समजते.

दरम्यान, काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार पक्षाला विश्वास आहे की कुमार आणि मेवाणी यांच्या प्रवेशामुळे नव्या दृष्टीने पक्षाला चालना मिळेल. कारण मागील दोन वर्षांपासून पक्षाला तरुण नेत्यांची अत्यंत गरज भासत असल्याचे चित्र दिसून आले आहे. ज्योतिरादित्य शिंदे, सुष्मिता देव, जितिन प्रसाद आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षात तरुण नेत्यांची पोकळी तीव्रतेने जाणवते आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा