Kantara | ‘कांतारा’ जाणार ऑस्करला, होंबळे प्रोडक्शनने दिली माहिती

Kantara | टीम महाराष्ट्र देशा: या वर्षी बॉक्स ऑफिसवर साउथ चित्रपटांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये ‘KGF-2’, ‘RRR’, ‘पुष्पा: द राइज’ यासारख्या चित्रपटाचा समावेश आहे. त्याचबरोबर साउथ इंडस्ट्री सुपरस्टार ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) चा चित्रपट ‘कांतारा’ (Kantara) ने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक बॉलीवूड चित्रपटांना मागे टाकले. अशा परिस्थितीत राजामौली यांचा चित्रपट ‘RRR’ ऑस्कर (Oscar) नामांकनासाठी पाठवण्यात आला होता. मात्र, या चित्रपटाची निवड होऊ शकली नाही. तर, आता या यादीमध्ये ‘कांतारा’चा समावेश होण्याची शक्यता आहे.

‘कांतारा’ (Kantara) जाणार ऑस्करला

मीडिया ग्रुपशी बोलताना होंबळे प्रोडक्शनचे संस्थापक विजय किरंगदूर म्हणाले की,”आम्ही ‘कांतारा’च्या ऑस्कर नामांकनासाठी अर्ज केला आहे. ‘कांतारा’ची कथा हृदयाला स्पर्श करून जाणारी आहे. त्यामुळे आम्हाला वाटत आहे की, कांताराचे ऑस्करसाठी नामांकन होऊ शकते. त्याचबरोबर ‘कांतारा’ चित्रपटातून आम्ही जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला जागतिक स्तरावर ओळख प्राप्त झाली आहे.” यावर्षी होंबळे प्रोडक्शन निर्मित ‘कांतारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

कांतारा या चित्रपटाने देशातच नाही तर परदेशातही जबरदस्त कमाई केली आहे. सोळा कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात तब्बल 400 कोटींची रुपये कमावले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे बॉलीवूड सुपरस्टारांकडून कौतुक होत आहे. प्रभास, रजनीकांत, अनुष्का शेट्टी, विवेक अग्निहोत्री आणि इतर अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

अभिनेता ऋषभ शेट्टी याने या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका तर साकारली होतीच पण त्याचबरोबर त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. या चित्रपटामध्ये ऋषभ शेट्टी बरोबरच किशोर, सप्तमी गौडा, मानसी सुधीर, दीपक राय, अच्युत कुमार या कलाकारांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.