Kantara OTT Release | ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर बघता येईल सुपरहिट ‘कांतारा’

टीम महाराष्ट्र देशा: या वर्षी बॉक्स ऑफिसवर साउथ चित्रपटांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये ‘KGF-2’, ‘RRR’, पुष्पा: द राइज यासारख्या चित्रपटाचा समावेश आहे. अशा परिस्थितीत साउथ इंडस्ट्री सुपरस्टार ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) चा चित्रपट ‘कांतारा’ (Kantara) बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने अनेक बॉलीवूड चित्रपटांना मागे टाकले आहे. गेल्या अनेक आठवड्यापासून ‘कांतारा’ प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये खेचत आहे. अशात ज्या प्रेक्षकांना ‘कांतार’ चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघणे शक्य झाले नाही त्यांच्यासाठी निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची योजना आखली आहे.

‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर बघता येईल सुपरहिट ‘कांतारा’ (Kantara) 

बॉक्स ऑफिसर धुमाकूळ घालत असलेल्या ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ चित्रपटाचा आनंद आता तुम्ही ओटीपी प्लॅटफॉर्मवर देखील घेऊ शकता. हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2022 पासून ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट भारतासह 240 देशांमध्ये मल्याळम, तेलगू तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

‘कांतारा’ या चित्रपटाने देशातच नाही तर परदेशातही जबरदस्त कमाई केली आहे. 16 कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात तब्बल 400 कोटींची रुपये कमावले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे बॉलीवूड सुपरस्टारंकडून कौतुक होत आहे. प्रभास, रजनीकांत, अनुष्का शेट्टी, विवेक अग्निहोत्री आणि इतर अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

अभिनेता ऋषभ शेट्टी याने या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका तर साकारली होतीच पण त्याचबरोबर त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. या चित्रपटांमध्ये ऋषभ शेट्टी बरोबरच किशोर, सप्तमी गौडा, मानसी सुधीर, दीपक राय, अच्युत कुमार या कलाकारांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.