Kapil Dev | कपिल देव यांनी खेळाडूंवर केली वादग्रस्त टीपणी, म्हणाले…

Kapil Dev | कोलकत्ता : 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाला प्रथमच विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय क्रिकेट खेळाडुंविरोधात वादग्रस्त टीपणी केली आहे. कोलकत्ता येथे एका कार्यक्रमात उपस्थित असताना कपिल देव यांनी हे वक्तव्य केले आहे. ते खेळाडूंच्या मानसिक आरोग्य आणि दबावबाबत बोलले आहे. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका करण्यात आली होती. तरीही कपिल देव आपल्या मतावर ठाम आहेत. ज्या खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना किंवा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दबाव जाणवतो त्या खेळाडूंनी क्रिकेट खेळणं बंद करावं, असे वक्तव्य कपिल देव यांनी केले आहे.

कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना त्यांचा दृष्टिकोन बदलण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर खेळाडूंनी खेळाचा आनंद घ्यावा असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. जे खेळाडू क्रिकेटमधील दबाव सहन करू शकत नाही त्यांनी खेळणे थांबवावे, असे देखील ते म्हणाले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करताना दबावाऐवजी अभिमान वाटला पाहिजे.”

ज्या खेळाडूंना खेळातील दबाव सहन होत नाही त्यांना कपिल देव यांनी “केळी विका किंवा अंडी विका” असे म्हटले आहे. कोलकत्ता येथील कार्यक्रमात भाषण देत असताना कपिल देव म्हणाले की, “खेळाडूंना दबाव सहन होत नसेल, तर त्यांनी केळीचा किंवा अंड्याचा स्टॉल उघडून ते विकण्याचे काम करावे. ज्या खेळाडूंना दबाव सहन होत नाही, त्या खेळाडूंना मी खेळाडू म्हणू शकत नाही”, असे वादग्रस्त वक्तव्य कपिल देव यांनी केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,” तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करत आहात आणि तुम्हाला दबाव जाणवतं आहेत. हे कसं शक्य आहे? देशाचे प्रतिनिधित्व करताना तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. कारण 100 कोटी लोकसंख्या असलेल्या त्याचे तुम्ही 20 खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करत आहात. त्याचा तुम्हाला दबाव न जाणवता अभिमान वाटला पाहिजे. खेळाडूंनी स्वतःला भाग्यवान मानायला पाहिजे, कारण तुम्हाला लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे. प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते. तुम्हाला मिळाले आहे, तर तुम्ही त्याचा अभिमान बाळगा.”

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.