Kapil Dev | “विश्वचषक जिंकायचा असेल तर…” ; कपिल देव यांनी मांडलं स्पष्ट मत

Kapil Dev | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षी आयसीसी (ICC) च्या मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघ काही विशेष कामगिरी करू शकला नव्हता. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघ टॉप चारमध्ये देखील पोहोचू शकला नव्हता. तर, गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यांमध्ये इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. अशा परिस्थितीत माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय संघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

मीडिया सोबत बोलताना कपिल देव म्हणाले,”भारताला विश्वचषक जिंकायचा असेल तर प्रशिक्षक, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याचबरोबर तुम्हाला वैयक्तिक गोष्टी मागे ठेवून संघाचा विचार करावा लागेल. विश्वचषक जिंकण्यासाठी तुम्हाला टीमवर विश्वास दाखवावा लागेल. फक्त दोन-तीन खेळाडूंवर विश्वास ठेवून विश्वचषक जिंकता येणार नाही.”

पुढे बोलताना कपिल देव म्हणाले,”काही खेळाडू संघाचे आधारस्तंभ असतात. म्हणून संघ त्यांच्याभोवतीच असतो. परंतु आपल्याला आता ही गोष्ट मागे सोडून किमान पाच-सहा चांगले खेळाडू तयार करावे लागतील. म्हणूनच मी म्हणतो तुम्हाला रोहित शर्मा आणि विराट कोहली फक्त यांच्यावर अवलंबून चालणार नाही. आपल्याला विश्वचषक जिंकण्यासाठी अजून खेळाडू लागतील.”

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेबद्दल बोलताना कपिल देव म्हणाले,”विश्वचषक भारतामध्ये होणार आहे आणि टीम इंडियासाठी ही सर्वात सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे या स्पर्धेत मैदानाची आणि इतर परिस्थिती आपल्यापेक्षा चांगली कोणालाच माहीत नसेल. गेल्या आठ दहा वर्षापासून विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारताचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. पण कदाचित हा त्यांचा शेवटचा विश्वचषक असू शकतो.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.