‘83’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत कपिल देव झाले भावुक; म्हणाले…

मुंबई : १९८३च्या विश्वचषकात भारताच्या विजयावर आधारित ’83’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. सिनेमात इतिहास घडवण्यासाठी भारतीय संघाने वेगवेगळ्या अडचणींवर मात कशी केली, यावर हा चित्रपट केंद्रित आहे.

कबीर खान दिग्दर्शित ’83’ ची कथा भारताच्या ऐतिहासिक १९८३ क्रिकेट विश्वचषक विजयाभोवती फिरते. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. हाच इतिहास 83 चित्रपटात रेखाटला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाचा हा ट्रेलर शेअर केला आहे. या पोस्टला त्यांनी ‘माझ्या संघाची कहाणी’ असे अभिमानाने म्हनत कॅप्शन दिले आहे.

तसेच, लॉर्ड्स मैदानात भारतीय संघाने रचलेला इतिहास पुन्हा नव्याने जगण्याची संधी या चित्रपटाद्वारे मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. ’83’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या