कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरमधला वाद मिटला, पुन्हा शोमध्ये दिसणार एकत्र?

मुंबई : छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे ‘द कपिल शर्मा’ शो. नव्या सीजनसह लवकरच पल्या भेटीला येणार आहे. यात सुनील ग्रोवर पुन्हा एकदा ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे सुनीलने शो सोडला होता. पण आता कपिल आणि सुनीलमधील वाद मिटला असल्याचे म्हटले जाते.

नुकताच सुनील ग्रोवरने यावर वक्तव्य केले आहे. ‘जर भविष्यात एखादा चांगला प्रोजेक्ट मिळाला तर कपिलसोबत नक्की काम करेन’ असे सुनील ग्रोवरने म्हटले आहे. लवकरच कपिल शर्मा त्याचा कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा’चे नवीन सिझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सुनील ग्रोवर ‘सनफ्लॉवर’ या सीरिजमध्ये दिसणार आहे.

‘द कपिल शर्मा’ शोमध्ये सुनील ग्रोवर डॉ. गुलाटी, गुत्थी आणि रिंकू भाभी या भूमिकांमध्ये दिसला होता. पण २०१६-१७मध्ये कपिलसोबत भांडण झाल्यामुळे सुनील ग्रोवरने शो सोडण्याचा निर्णय घेतला.

२१ जुलै पासून पुन्हा द कपिल शर्मा शोचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १५ मे पासून शोचे चित्रीकरण सुरु झाल्याचे म्हटले जाते. या वेळी शोमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये शोबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा