कपिल शर्मा-भारती सिंहचा ‘बसपन का प्यार’ व्हायरल

मुंबई : कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा आणि कॉमेडी क्वीन भारती सिंह हे आपल्या विनोदाने लोकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. आता सध्या सोशल मीडियावर त्या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे गाणे गाताना दिसत आहेत आणि त्यांचे गाणे ऐकून एक चाहती चक्क तेथून पळून जाते. कपिल आणि भारतीचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतं आहे.

या व्हिडिओमध्ये भारती आणि कपिल एका कारमध्ये बसले असून सोशल मीडियावर व्हायरल झालेलं ‘बसपन का प्यार’ हे गाणे गाताना दिसतं आहेत. दरम्यान तेथे एक चाहती येते आणि त्या दोघांचे गाणे ऐकून त्यांच्यासोबत फोटो काढण्याआधीच पळून जाते. त्या चाहतीला पळताना पाहून भारती म्हणते, ‘ये जानेमन.. कहा भाग रही हो? रुको रुको… फोटो तोह खिचाओ.’ भारती आणि कपिलचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये भारती आणि कपिल ज्या प्रकारे गाणे गात आहेत ते पाहून सर्वांना हसू अनावर झाले आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. सध्या हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून याची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा