कॉमेडियन कपिल शर्मा झाला बाबा !

मुलगी झालीय. तुमचे असेच आशीर्वाद असू द्या…, असे ही बातमी शेअर करताना कपिलने लिहिले. त्याने ही बातमी शेअर करतानाच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग, सायना नेहवाल, गुरु रंधावा, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आदींनी त्याला शुभेच्छा दिल्यात.गिन्नी आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. २००७ साली कॉमेडी रिएलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिलने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने कित्येक शोजमध्ये काम केले.

कॉमेडी सर्कस, झलक दिखला जा ६ व उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगली पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही आणि त्याने कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. या शोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.गतवर्षी त्याने गिन्नीसोबत लग्न केले. त्यापूर्वी दीर्घकाळ दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र कपिलने या रिलेशनशिपबद्दल बरीच गुप्तता पाळली होती. अखेर 2017 मध्ये गिन्नीसोबतचा फोटो शेअर करत त्याने हे नाते जगजाहिर केले होते.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.