InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बारामतीकरांना कर्जतचे आकर्षण-सुजय विखे

विखे आणि पवार कुटुंबातील संघर्ष आता विधानसभेच्या निवडणूकीमध्ये देखील गाजणार असे दिसत आहे. कारण आता बारामतीकरांना कर्जतचे आकर्षण निर्माण झाले आहे असा टोला सुजय विखे पाटलांनी पवार कुटुंबाला लगावला. यासोबतच पालकमंत्री राम शिंदे यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतली आहे असे म्हणत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शरद पवार आणि त्यांचे नातू रोहीत पवार यांना उघड आव्हाण दिले. यामुळे आता लोकसभेनंतर पुन्हा एकदा पवार आणि विखे कुटुंबातील संघर्ष आपल्याला दिसणार आहे. यामुळे राजकीय गोटामध्ये चर्चेला उधान आले आहे.

पुर्वी कर्जत तालुक्यातील लोकांना बारामतीचे आकर्षण होते. आता बारामतीकरांना कर्जतचे आकर्षण निर्माण झाले आहे. अशी राजकीय टोलेबाजी खासदार सुजय विखेपाटील यांनी कर्जत येथील हॉटेल उदघाटनाच्या कार्यक्रमामध्ये केली. यामुळे विधानसभेच्या निवडणूकीपुर्वीच राजकीय वाद सुरू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply