Karan And Bipasha | “मला आणि करणला मुलीची अपेक्षा आहे…” ; बिपाशा बसूने शेअर केली तिच्या मनातली गोष्ट

मुंबई : बिपाशा बसू लवकरच आई होणार आहे. आजकाल ती अनेकदा सोशल मीडियावर तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बिपाशा आणि करण सिंग ग्रोवर यांनी सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची अधिकृत घोषणा केली होती. तेव्हापासून अभिनेत्री तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. आता अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान बिपाशाने तिच्या तिच्या आगामी मुलाबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर केल्या.

बिपाशा आणि करण करत आहेत मुलीची अपेक्षाः 

बिपाशा आणि करण लग्नानंतर बाळासाठी प्लॅनिंग करत असले तरी लोकांच्या नजरेत या गुड न्यूजमुळे दोघेही खूप खूश आहेत. लोक त्यांच्याबद्दल काय विचार करत आहेत याची दोघांनाही पर्वा नाही. अलीकडेच एका ऑनलाइन मुलाखतीत बिपाशाने खुलासा केला की ती आणि करण दोघेही एका मुलीची अपेक्षा करत आहेत.

बिपाशाने सांगितले की, करण आणि मी सुरुवातीपासूनच क्लिअर आहोत. आम्हा दोघांना मुलीची अपेक्षा आहे. सोशल मीडियावरील लोकांचं काम फक्त न्यायनिवाडा करणं आहे. लोक म्हणतात बाळाच्या नियोजनात एवढा उशीर का? पण, ही वेळ आम्हा दोघांसाठी योग्य आहे आणि आम्ही आनंदी आहोत. मला वाटतं जेव्हा आपण तयार असतो तेव्हाच हे व्हायला हवं. मला माहित आहे की मूल ही देवाची खूप गोड भेट आहे. आपण आनंदाने कोणतंही लिंग स्वीकारलं पाहिजे, मात्र आम्हाला खात्री आहे की आम्हाला मुलगी होईल.

महत्वाच्या बातम्याः

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.