Karan Kundra & Tejasswi Prakash | करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या दिवाळी लूकला चाहत्यांकडून मिळाले भरभरून प्रेम

मुंबई: बिग बॉस 15 Big Boss 15 फेम करण कुंद्रा Karan Kundra आणि तेजस्वी प्रकाश Tejasswi Prakash हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय आणि लाडके जोडपे बनले आहे. दोघे अनेकदा एकमेकांच्या कंपनीचा आनंद लुटताना दिसतात. तसेच हे जोडपे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात. लव्ह स्कूलचा होस्ट करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची प्रेम कहानी बिग बॉस 15 च्या घरामध्ये सुरू झाली होती. बिग बॉस घरात सुरू झालेली ही प्रेम कहानी घराबाहेर आल्यावर अधिकच फुलत गेली. दोघे अनेकदा एकत्र दिसतात आणि त्याचबरोबर सगळे सण उत्सव एकत्र साजरे करताना दिसतात. दरम्यान, या जोडप्याने सध्या दिवाळी Diwali हा सण एकत्र प्रेमाने साजरा केलेला दिसत आहे.

करण आणि तेजस्वी ची दिवाळी

करण कुंद्राने नुकत्याच सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, करनणे ही दिवाळी त्याच्या लेडी लव  म्हणजेच तेजस्वी प्रकाश सोबत साजरी केली आहे. या पोस्टमध्ये दोघेही सुरसुरी उडवताना दिसत आहे. करण आणि तेजस्वीच्या दिवाळी आउटफिट बद्दल बोलायचं म्हणलं तर, करणने या खास प्रसंगी, गुलाबी रंगाचा कुर्ता घातलेला असून पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर तेजस्विनी केशरी रंगाचा ड्रेस आणि दुपट्टा घेतला आहे. तेजस्वीने घातलेले आकर्षक झुमके आणि तिचे मोकळे केस तिच्या या लुकला परिपूर्ण करत आहे. करण कुंद्राने शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्ट वर चाहत्यांनी कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.

करण कुंद्रा Karan Kundra च्या दिवाळी पोस्टवर चाहात्यांच्या प्रेमाचा वर्षाव

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी सोबत दिवाळी साजरी करत त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यांचे हे फोटो वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्या या पोस्टवर हार्ट ईमोजी कमेंट केला आहे. तर दुसरीकडे एकाच चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे, “मोस्ट अवेटेड दिवाळी पिक्चर तेजरान”. तर अजून एक चाहता कमेंट म्हणाला की, “किसी की नजर ना लगे”.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.