InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कर्जतची लढत रोहित पवार विरुद्ध सुजय विखे पाटील

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची चौथी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. जेमतेम दोन महिन्यांच्या तयारीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळ मतदार संघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. परंतु, पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार संपूर्ण तयारीनिशी कर्जतमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.

त्यांच्या तयारीवर भाजपकडून डावपेच आखण्यात येत असून नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांनी देखील भाजपचे राम शिंदे यांच्या विजयाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे कर्जतची लढत रोहित पवार विरुद्ध सुजय विखे पाटील अशीच रंगणार असं दिसतय.

कर्जत येथे आयोजित एका कार्यक्रमात सुजय विखे यांनी प्रा. राम शिंदे यांना विधानसभेला विजयी करण्याची जबाबदारी आपली असल्याचे म्हटले आहे. वस्तविक पाहता, कर्जतमधून लोकसभेला सुजय विखे यांना लीड मिळाली नव्हती.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply