Karjat-Jamkhed | कर्जत-जामखेडमध्ये काँग्रेसला खिंडार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Karjat-Jamkhed | अहमदनगर: राजकीय क्षेत्रात नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इकडून तिकडे, तिकडून इकडे प्रवेश करत असतात. त्यामुळे हि बाब फार काही नविन नाही. अशातच आता अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडमध्ये काँग्रेसमधील जिल्हा परिषद माजी सदस्य प्रवीण घुले यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. शेतकरी मेळाव्यात हा प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राम शिंदेंचं भाकीत खरं होणार? (Ram Shinde’s Predection Come True)

भाजप नेते राम शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी कर्जत-जामखेडच्या भागात राजकीय भूकंप होणार असं भाकित केलं होतं. आज अहमदनगरमध्ये काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. याचा फायदा भाजपला होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? (What Did Say Devendra Fadnavis?)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी मेळाव्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ समाज अण्णा हजारे देखील उपस्थित होते. या मेळाव्यात फडणवीस म्हणाले की, “राज्यातील जलयुक्त शिवार योजना ही मागील सरकारने बंद केली. तसेच काल आम्ही अधिवेशनात ती योजना दुसऱ्या टप्यात सुरू केली.” असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या