InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कर्नाटकचे आमदार साईदर्शनासाठी शिर्डीत दाखल

सध्या कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. यानंतर कर्नाटकचे बंडखोर आमदार शिर्डीत दाखल झाले आहेत. मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जोरदार विरोध केला आहे. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक झाले. शिर्डी विमानतळाच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन सुरु आहे. काँग्रेसकडून बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

कर्नाटकचे 6 ते 7 आमदारांचे चार्टर प्लेन शिर्डी विमानतळावर लँड झाले. दरम्यान शिर्डी विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र तरीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना साईदर्शनासाठी जाण्यास मज्जाव केला आहे. कर्नाटकात आता काँग्रेसच्या एका खेळीनं भाजपला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपमधील तब्बल 7 आमदार काँग्रेस-जेडीएसच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपनं काँग्रेसला धक्का देत काही आमदार आपल्याकडे खेचले.

महत्वाच्या बातम्या-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply