Karnataka Election | “कर्नाटकमध्ये विजय मिळाला असता तर श्रेय मोदींनी…” ; सामना अग्रलेखातून भाजपवर खोचक टीका

Karnataka Election | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपची चांगलीच पीछेहाट झाली आहे. या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे. आगामी काळामध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये भाजपची सत्ता राहणार नसल्याचं, या अग्रलेखातून म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजपच्या पराभवाचे खापर नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय नेत्यांवर फोडलं असल्याचा आरोपही या अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

भाजपने लोकांना भरकटवले

सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र चालवण्यात आला आहे. “काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असले तरी त्यांनी निवडणुकीदरम्यान ते दिसू दिले नाही. मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा असणारे डी. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी प्रचाराची जबाबदारी हायकमांडवर सोपवून दिली होती. तर कर्नाटकमधले भाजपचे बोम्मई सरकार भ्रष्टाचार आणि लुटमारीच्या प्रकरणात पूर्णपणे बदनाम झाले होते. त्याचबरोबर प्रचार करत असताना भाजपने हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून लोकांना भरकटण्याचा प्रयत्न केला होता”, असं सामना अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

कर्नाटकमध्ये भाजप पहाटेचा शपथविधी घडवू शकत नाही

“कर्नाटकमध्ये काँग्रेसचे बहुमत इतके पक्के आहे की, भारतीय जनता पक्ष कर्नाटकमध्ये फोडाफोडी करून सत्ता काबीज करण्याचे स्वप्न देखील आता पाहू शकत नाही. कर्नाटकमध्ये भाजप महाराष्ट्रासारखा पहाटेचा शपथविधी घडवू शकत नाही. कारण कर्नाटकातील भाजपमध्ये तेवढी कुवत नाही. कर्नाटकमध्ये भाजपला विजय मिळाला असता तर त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले असते. मात्र, पराभवाचे खापर नड्डा यांच्या डोक्यावर फोडले जात आहे”, अशी खोचक टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

बजरंगबलीने गदा फिरवून मोदींच्या डोक्यात मारली

“काँग्रेसने बजरंगबलीचा अपमान केला आहे म्हणून भाजपला विजयी करा, असे सांगणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परभवाचे करण ठरले आहे. मोदींनी प्रचारासाठी बजरंगबलीचा वापर केला. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी त्यांनी हनुमान चालीसा सारखे कार्यक्रम करायला लावले. मात्र, या सर्वांचा कर्नाटकमध्ये काही परिणाम झाला नाही. या उलट बजरंगबलीने गदा फिरवून मोदींच्या डोक्यात मारली आहे”, असं देखील या अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या