Karnataka Election Result | “कर्नाटकमध्येही फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता…”; कर्नाटक निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

Karnataka Election Result | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटक निकालावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “कर्नाटकमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता आहे. मात्र, जनतेने दिलेल्या निकालानुसार कर्नाटकमध्ये फोडाफोडी करायला संधी नाही. कर्नाटकच्या जनतेने त्याची खबरदारी घेतली आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “मोदी है तो मुनकीन हैं असं भाजप लोकांनी याआधी बोलायला सुरुवात केली होती. भाजपाने हळूहळू सगळी सूत्र एका व्यक्तीच्या हातात दिली. मात्र, लोकांचा या गोष्टीला पाठिंबा नसल्याचं दिसून आलं आहे.”

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्रात दोन दिवसांनी आम्ही महाविकास आघाडीची बैठक बोलावली आहे. मी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र बसून पुढची तयारी करणार आहे.”

महत्वाच्या बातम्या