Karnataka Election Result | कानडी जनतेनं मोदी- शाहांचं ऐकलं नाही- संजय राऊत

Karnataka Election Result | मुंबई: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कानडी जनतेने मोदी-शाहांचं ऐकलं नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे.

कर्नाटक निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, “कर्नाटकमधील पराभव फक्त भाजपचा नाही तर हा पराभव नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सर्वांचा आहे. कानडी जनतेने मोदी-शाहांचं ऐकलं नाही.”

माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. “देशातील महत्त्वाची कामं सोडून मोदी कर्नाटकात प्रचार करत होते. देशात दंगली सुरू असताना मोदी प्रचारामध्ये व्यस्त होते.” “हिम्मत असेल तर शाहांनी कर्नाटकामध्ये आता दंगे करून दाखवावे”, असे आवाहन देखील राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, कर्नाटक निकालावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “कर्नाटकमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता आहे. मात्र, जनतेने दिलेल्या निकालानुसार कर्नाटकमध्ये फोडाफोडी करायला संधी नाही. कर्नाटकच्या जनतेने त्याची खबरदारी घेतली आहे. मोदी है तो मुनकीन हैं असं भाजप लोकांनी याआधी बोलायला सुरुवात केली होती. भाजपाने हळूहळू सगळी सूत्र एका व्यक्तीच्या हातात दिली. मात्र, लोकांचा या गोष्टीला पाठिंबा नसल्याचं दिसून आलं आहे.”

महत्वाच्या बातम्या