Karnataka Election Results । कर्नाटकातील काँग्रेसच्या दमदार विजयावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Rahul Gandhi | नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (13मे) जाहीर झाला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ( Congress) पूर्ण बहुमताचं सरकार स्थापण होणार आहे. यामुळे काँग्रेसकडून जल्लोष होत असल्याचा पाहायला मिळतं आहे. भाजपने (BJP) या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती परंतु बाजी मात्र काँग्रेसने मारलेली पाहायला मिळत आहे. तर या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी
पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधी म्हणाले की, ही लढाई आम्ही प्रेमाने जिंकली आहे “द्वेषाचा बाजार बंद झाला असून प्रेमाचं दुकानं उघडलं आहे”. यामुळे मी कर्नाटकच्या जनतेला धन्यवाद देतो आणि हा सर्वांचा विजय आहे, सर्वात आधी हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे. मी, खरगेजींनी आमच्या नेत्यांनी जी काही आश्वासन तुम्हाला दिली होती ती लवकरात- लवकर पूर्ण करणार आहोत. आम्ही हे वायदे पहिल्याच दिवशी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण करणार आहोत. अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी विजयानंतर दिली आहे.
( Rahul Gandhi speaks On Today Karnataka Election Result)
दरम्यान, काँग्रेस पुन्हा उभारी घेऊ शकणार नाही. राहुल गांधी यांचं पद देखील काढून घेण्यात आलं असल्याने काँग्रेसचं भविष्यात काय होणार याबाबत चर्चा सुरू होत्या. परंतु, आजच्या कर्नाटक निकालानंतर मात्र काँग्रेसने भाजपला काटे की टक्कर देत विजय मिळवला आहे. कर्नाटकात २२४ जागांवर झालेल्या विधानसभा निवडणुक झाली. यामध्ये काँग्रेस १३७ जागांवर विजयी झाला असून भाजप ६२, जेडीएस २१, इतर पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहेत, हे आकडे जवळपास निश्चित मानले जात आहेत. बऱ्याच वर्षांनंतर काँग्रेसला असा दणदणीत विजय मिळाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात देखील भाजपची खिल्ली उडवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Jitendra Awhad | “प्रभू हनुमानाला ही गोष्ट आवडलेली…”; कर्नाटक निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर घणाघात
- Karnataka Election Result | ‘चित्रा ताईचा पायगुण अत्यंत वाईट’; रूपाली पाटील ठोंबरेंचं चित्रा वाघांवर टीकास्त्र
- Sushma Andhare | ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’, असं काही नसतं; सुषमा अंधारे यांचा खोचक टोला
- Sanjay Raut | काँग्रेसचा विजय कर्नाटकमधील भाजपाचा पराभव नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे – संजय राऊत
Comments are closed.