InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

तीन दिवसात माफी मागा, अन्यथा घरात घुसून मारु, जावेद अख्तर यांना धमकी

- Advertisement -

तुम्ही माफी मागितली नाही, तर तुमच्या घरात घुसून मारु, अशी धमकी गीतकार जावेद अख्तर यांना राजपूत करणी सेनेने धमकी दिली आहे.

जावेद अख्तर यांनी केवळ बुरखाच नव्हे तर घुंघटवरीही बंदी घाला असं म्हटलं होतं., यावरून राजपूत करणी सेनेने जावेद अख्तर यांना धमकी दिली आहे.

करणी सेनेचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जीवन सिंह सोळंकी यांनी पत्र प्रसिद्ध केलं आहे.जावेद अख्तर यांनी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा परिणामांना सामोरं जावं, अशी धमकी सोळंकी यांनी दिली आहे. जर तुम्ही माफी मागितली नाही, तर तुमच्या घरात घुसून मारु, असंही या पत्रात म्हटलं आहे. या पत्रासोबत व्हिडीओ रेकॉर्डिंगही पाठवण्यात आलं आहे.

या धमकीनंतर जावेद अख्तर यांनी ट्विट करत, “काही लोक माझ्या वक्तव्याचा अर्थ चुकीचा लावत आहेत. मी म्हटलं होतं की सुरक्षेच्या दृष्टीने श्रीलंकेत बुरखाबंदी केली असावी, मात्र वास्तविक पाहता, हे महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे. चेहरा झाकणे बंद करायला हवं. मग तो बुरखा असो किंवा घुंघट”, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.