InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

करतारपूर कॉरिडोर: भारताच्या अनेक मागण्या पाकला मान्य

रत आणि पाकिस्‍तानमध्ये आज (ता.१४) करतारपूर कॉरिडॉरवरून द्विपक्षीय बैठक पार पडली. यामध्ये कॉरिडॉरमधील अडथळे दूर करण्यासाठी रणनितीवर विचार विमर्श करण्यात आला. दोन्ही देशांतील अधिकार्‍यांमध्ये झालेल्‍या बैठकीत भारताने पाकिस्‍तानसमोर भक्‍तांना व्हिसा फ्री प्रवेश देण्याची मागणी केली. ही मागणी पाकिस्तानने मान्य केली. त्यामुळे ५ हजार भाविकांना दर दिवशी दर्शन घेता घेता येणार आहे.

बैठक संपल्‍यानंतर गृह मत्रालयाचे संयुक्‍त सचिव एससीएल दास यांनी सागितले की, भारताने डेरा बाबा नानक आणि आसपासच्या परिसरातील पूर परिस्‍थितीवरून चिंता व्यक्‍त केली. दरम्‍यान, पाकिस्‍तानी विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते डॉ. मोहम्‍मद फैसल यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्‍तान या दोन्ही देशांमध्ये ८० टक्‍के मुद्यावर सहमती झाली आहे. बाकी मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये आणखी एक बैठक करण्याची गरज त्‍यांनी बोलून दाखवली.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply