Karthik Aryan | अभिनेता कार्तिक आर्यन लालबागच्या राजाच्या दर्शनाला

मुंबई : हिंदू धर्मामध्ये, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशच्या पूजेने केली जाते. त्यांच्याशी संबंधित पवित्र सण म्हणजे गणेश चतुर्थी यावर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला म्हणजेच 31 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. या पवित्र तारखेपासून, गणपती बाप्पाचा 10 दिवसांचा उत्सव सुरू होतो, जो अनंत चतुर्दशीला संपतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण रिद्धी-सिद्धी दाता, जीवनातील संकटं दूर करणार्‍या आणि सर्व मनोकामना पूर्ण करणार्‍या श्रीगणेशाचं आगमन झालं आहे. याचसंदर्भातील बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसून येतं आहे.

कार्तिक आर्यन याने घेतलं लालबागच्या राजा चं दर्शन-

मुंबईमधल्या लालबागच्या राजाला वंदन करण्यासाठी अनेक भाविक वेगवेगळ्या ठिकाणांहून येत असतात. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते अगदी बॉलिवूड अभिनेत्री-अभिनेत्यांचाही यामध्ये समावेश होत असतो. अशातच बॉलवूड सर्वांचा लाडका अभिनेता कार्तिक आर्यन याने नुकतच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं असल्याचं समजतं आहे.

फोटो आणि व्हिडीओ व्हायरल-

दर्शन घेतल्यानंतर कार्तिकने प्रसारमाध्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने सांगितले की, गणपतीची आराधना केल्यानंतर त्यांच्या पायावर मी नारळ अर्पण केला. कार्तिकचा लालबागच्या राजाचं दर्शन घेतानाचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले पाहायला मिळतं आहेत. व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे की, कार्तिकने फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता आणि त्या खाली पांढरा पायजामा घातला आहे.

दरम्यान, पुढचे नऊ दिवस सर्वांच्या घरामध्ये बाप्पाच्या आगमनामुळे मंगलमय वातावरण राहणार आहे. तसेच सर्वांच्या घरामध्ये सुख, शांतीचाही वास असणार आहे. सर्वत्र उत्साहाचंच आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.