‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा सिनेमा ‘भूल भुलैय्या’ एका मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक होता. 2007 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. त्यानंतर बऱ्याच काळापासून या सिनेमाच्या सिक्वेल तयार करण्याची चर्चा सुरू होती. मात्र त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नव्हती. पण आता या ‘भूल भुलैय्या 2’ची वाट पाहणाऱ्यासाठी एक खूशखबर आहे. या सिनेमाचा सस्पेन्स संपला असून या सिनेमासाठी आता कार्तिक आर्यनचं नावं फायनल करण्यात आलं आहे. या सिनेमाचं फर्स्ट पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलं

Loading...

‘भूल भुलैय्या 2’मधील कार्तिक आर्यनचा फर्स्ट लुक समोर आला असून यात कार्तिक हुबेहूब अक्षय कुमारच्या स्टाइलमध्ये दिसत आहे. भूल भुलैय्या 2’चा पहिला लुक प्रोड्यूसर भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला. या सिनेमाचं दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत.

या सिनेमचं पोस्टर रिलीज करताना, ‘13 वर्षांनंतर… द हॉन्टिंग कॉमेडी रिटर्न्स’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या पोस्टरवर तरी कार्तिकच्या लुकमध्ये जास्त बदल करण्यात आला नसला तरीही रुपेरी पडद्यावर कार्तिक अक्षय सारखी जादू दाखवणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.