Karuna Munde | अजित पवार आणि फडणवीसांच्या शपथविधीचे प्लॅनिंग धनंजय मुडेंनी केले – करुणा मुंडे

Karuna Munde | मुंबई : 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज भवनात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला होता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. तर अजित पवार (Ajit Pawar) यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. याच मुद्यावरून धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सकाळच्या शपथविधीचं कटकारस्थान हे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) याचं होतं, असा दावा करूणा मुंडेंनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाल्या करुणा मुंडे (Karuna Munde)

“धनंजय मुंडे 2019 ला सकाळी सात वाजता 40 आमदार घेऊन भाजपकडे गेला होतात. त्यावेळी एका दिवासाचं सरकार बनवलं होतं आणि स्वत: लपले होते. या सगळ्यामागचं षडयंत्र मला माहिती आहे. हे सगळं धनंजय मुंडे यांनी केलं होतं. हे तुम्ही केलं तर चमत्कार आणि दुसऱ्यांनी केलं तर बलात्कार. आताच्या घडीला भाजप पक्षाला असे काही षडयंत्र करून कोणाला जोडायची किंवा कोणाला तोडायची गरज नाही. आमचे मोदीजी खूप पावरफुल आहेत,” असे करुणा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडेंनी शरद पवारांना धोका दिला-

करुणा मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडे 40 आमदारांना घेऊन गेले आणि शरद पवार यांना धोका दिला. त्याच शरद पवारांनी मुंडेंसारख्या व्यक्तीला आमदार केलं, एवढी जबाबदारी दिली, विरोधी पक्षनेत्याचे पद दिले आणि या धनंजय मुंडेंनी एका दिवासाचं सरकार बनवण्यासाठी पवार यांना धोका दिला. एवढं सगळं झाल्यानंतर रात्री आले आणि गंगेच्या पाण्याने स्नान केलं आणि शरद पवारांनीही त्यांना माफ केलं. त्याचबरोबर मुंडेंना कॅबिनेट मंत्री केले. हॅट्स ऑफ आहे शरद पवारांना. एवढं होऊनही धनंजय मुंडे मिडीयासमोर खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी करतो. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तोडायच्या मागे आहे, असे सांगतो. मात्र हे सगळं छिछोरेगरी आहे. परंतु आता हीच छिछोरेगिरी नाही चालणार. कारण आता मी पण त्याच लाईनमध्ये चालली आहे. माझ्या पाठिमागे जे-जे षडयंत्र सुरू आहे. ते मी लवकरच मोठी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांच्या समोर आणणार आहे.”

धनंजय मुंडे सारखा माणूस कोणाचाच होऊ शकत नाही-

“तसेच, धनंजय मुंडे सारखा माणूस कोणाचाच होऊ शकत नाही. तो गोपीनाथ मुंडेंचा होऊ शकला नाही, त्यांनाही धोका दिला. शरद पवारांनीही त्यांना सहारा दिला, परंतु त्यांनाही मुंडेनी धोका दिला. एवढंच नाहीतर त्यांनी स्वत:च्या पत्नीला म्हणजे मला आणि त्याच्या दोन मुलांनाही धोका दिला आहे. मी आताच रूपाली चाकणकर यांना धनंजय मुंडे यांच्याविरोधातील माहिती दिली आहे. त्यामुळे आता मी बघते की, महिला आयोग मला यामध्ये किती मदत करते”, असे देखील करुणा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.