Kasba By-Election | 30 वर्षानंतर भाजपच्या हातातून कसबा निसटणार??; नवव्या फेरीत धंगेकर की रासने कोण आघाडीवर??

Kasba By-Election | पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीचे राज्याच्या राजकारणात मोठे परिणाम दिसून येणार आहेत. सुरुवातीला टपाल मतांची मतमोजणी सुरु झाली. त्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी मोठी आघाडी घेतली होती. कसबा निवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्याच मुख्य लढत पहायला मिळाली आहे.

राज्यात अनेक नाट्याने गाजलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची नववी फेरी सुरू असून पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. नवव्या फेरीत देखील रवींद्र धंगेकर यांनी साडेचार हजार मतांची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीपासूनच दीड हजार मतांची आघाडी घेऊन धंगेकर यांनी दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे भाजपला तब्बल 30 वर्षानंतर कसबा हातातून गमाववं लागतं की काय असं चित्रं निर्माण झालं आहे. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने हे निवडणूक लढत आहेत.

Ravindra Dhangekar leading in Kasba by-election

कसबा पोटनिवडणुकीत नवव्या फेरीत धंगेकर यांना 34 हजार 778 मते मिळाली. तर हेमंत रासने यांना 30 हजार 272 मते मिळाली आहेत. आनंद दवे यांना 100 मतांवरच समाधान मानावे लागले आहे. नवव्या फेरीत धंगेकर यांना 4506 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे धंगेकर हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत आहे.

सातव्या फेरीत कोण आघाडीवर?

सातव्या फेरीत रवींद्र धंगेकर यांना 25 हजार 904 मते मिळाली आहेत. हेमंत रासने यांना 24 हजार 633 मते मिळाली होती. धंगेकर अवघ्या 1 हजार 271 मतांनी आघाडीवर आहे. सहाव्या फेरीत धंगेकर यांना 23 हजार 80 मते मिळाली होती. रासने यांना 20 हजार 363 मते मिळाली होती. तर आनंद दवे यांना 100 मते मिळाली होती. धंगेकर हे 2 हजार 717 मते घेऊन आघाडीवर होते. पाचव्या फेरीत रवींद्र धंगेकर यांना 19 हजार 645 मते मिळाली. तर रासने यांना 16 हजार 423 मते मिळाली. धंगेकर हे 3 हजार 222 मतांना आघाडीवर होते.

आठव्या फेरीतही धंगेकर आघाडीवर

रवींद्र धंगेकर यांना आठव्या फेरीत 30 हजार 527 मते मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना 27 हजार 187 मते मिळाली आहेत. धंगेकरांनी 3500 मते घेऊन आघाडी केली आहे.

नवव्या फेरीतही धंगेकरांची आघाडी कायम

कसबा पोटनिवडणुकीत नवव्या फेरीत धंगेकर यांना 34 हजार 778 मते मिळाली. तर हेमंत रासने यांना 30 हजार 272 मते मिळाली आहेत. आनंद दवे यांना 100 मतांवरच समाधान मानावे लागले आहे. नवव्या फेरीत धंगेकर यांना 4506 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे धंगेकर हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-