Kasba Bypoll Election Result | “लोकांनी पैसे घेतले पण मत ह्रदयातल्या धंगेकरला दिलंय”; रवींद्र धंगेकरांचं मोठं वक्तव्य

Kasba Bypoll Election Result | पुणे : महाराष्ट्रात पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीवर सगळ्यांचे बारीक लक्ष आहे. या मतमोजणीची सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. दोन्ही मतदारसंघातील निवडणुका सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्रतिष्ठेच्या केल्या होत्या.

कसबा निडणुकीत भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्यावरूनही भाजपमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला. आज कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी होत असून या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य (Ravindra Dhangekar big Statement)

“लोकांनी पैसे घरात ठेवले आणि ह्रदयातला धंगेकर काढून मतदानाला आले. महाविकास आघाडीच्या विजयाची इथून सुरुवात झाली आहे. ती राज्यातही सत्ता घेणार आहे. भाजपला जनतेनं कात्रजचा घाट दाखवलाय. हा लोकशाहीचा विजय आहे. मी सर्वसमावेशक राजकारण केल्यामुळे त्याचं हे चित्र दिसतंय. कालच माझी पत्नी म्हणाली की, तुम्हाला आता सगळं अवघड आहे. तुमच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. तुम्हाला खूप काम करायचं आहे”, असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.

धंगेकरांच्या या वक्तव्यावरुन निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारावर चर्चा सुरू झाली आहे. कसब्यातून मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणालातरी भाजपने उमेदवारी द्यावी, अशी भूमिका विरोधकांकडून घेतली गेली होती. टिळक कुटुंबीयांकडूनही तशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती.

मात्र, भाजपने हेमंत रासनेंना उमेदवारी दिल्यामुळे हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला होता. त्यापाठोपाठ महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिली. त्यासह भाजपच्या भूमिकेचा विरोध करत हिंदू महासभेकडून आनंद दवेंनीही उमेदवारी दाखल केली. त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होताना पाहायला मिळाली.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.